पिंपरी (पुणे) – कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ४ सहस्र ५१३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत मालमत्ता धारकांच्या कुटुंबियांना पुढील आर्थिक वर्षात सामान्य करात १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे, तसेच मालमत्ता हस्तांतरण नोंद सूचना शुल्कही माफ करणार आहे. आगामी आर्थिक वर्ष २०२२ -२३ मध्ये मालमत्ता कराचे दर आधीच्या दराप्रमाणे ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला असून सदर प्रस्तावाच्या अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे त्याची शिफारस केली आहे. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ता धारकांच्या मालमत्ता हस्तांतरण करण्याच्या मोहिमेला मुदतवाढ दिली असून ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ही योजना राबवण्यात येणार आहे.