कार्यक्रमात आयोजकांकडून सनातन-निर्मित ३० धर्मशिक्षण फलक ग्रंथांचे विनामूल्य वाटप !
पुणे, ७ डिसेंबर (वार्ता.) – येथील सिंहगड रस्त्यावरील वृंदावन सभागृह येथे ५ दिवसांचा श्रीमद् भागवत कथा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजक श्री. राजेशजी उम्मेदरामजी बोलद्रा (शर्मा) यांनी सनातन-निर्मित हिंदी भाषेतील ३० धर्मशिक्षण फलक ग्रंथ प्रायोजित केले. या वेळी कथावाचक संत श्री मथुरादासजी बापू (गुरुजी) यांच्या श्रीहस्ते सर्व महिला भजनी मंडळ आणि मान्यवर यांना पुष्पगुच्छ आणि ‘धर्मशिक्षण फलक’ ग्रंथ देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. कृष्णाजी पाटील यांनी संत श्री मथुरादासजी बापू (गुरुजी) यांना वर्ष २०२२ चे सनातन पंचांग भेट दिले. सर्व महिला भजनी मंडळ, स्थानिक गोभक्त यांचाही आयोजनामध्ये सहभाग होता.