पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ‘मिळकतकर अभय योजना’ राबवणार !

मतांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यात दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात. थकबाकीदारांमध्ये निवडणुका आल्या की, ‘करसवलत मिळते’, अशी चुकीची धारणा व्हायला नको !

स्वातंत्र्यवीर सावरकरांची राजकीय दृष्टी निर्माण झाल्यासच भारतात ‘पाकीस्तान झिंदाबाद’च्या घोषणा बंद होतील ! – दुर्गेश परुळकर, अध्यक्ष, स्वा. सावरकरप्रेमी मंडळ

‘समाजक्रांतीकारक सावरकर’ या विषयावर स्वा. सावरकरप्रेमी मंडळाच्या वतीने व्याख्यान !

म्हाडाची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकरणात ३ जणांना अटक !

म्हाडाची परीक्षा घेणार्‍या ‘जी.ए. सॉफ्टवेअर प्रा.लि. कंपनी’चे अधिकारी प्रीतेश देशमुख आणि त्याचे दोन मित्र यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. प्रश्नपत्रिकेची विक्री करण्यासाठी आले असतांना पोलिसांनी त्यांना पकडले.

विद्यार्थ्यांनी आपला देश, राज्य आणि गाव यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

जागतिक पातळीवर प्रगती करतांना विद्यार्थ्यांनी आपला देश, राज्य आणि गाव यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. देशाच्या उत्कर्षाचा विद्यार्थ्यांनी प्राधान्याने विचार करावा.

पुणे शहरात ‘होर्डिंग’ लावण्यासाठी सर्रास वृक्षतोड !

शहरात अनधिकृत आकाशचिन्ह फलक (होर्डिंग) लावणार्‍यांना ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याचा नियम महापालिकेने केला आहे; पण शहरात अनेक होर्डिंग व्यावसायिकांनी सर्रास झाडांच्या फांद्या तोडून मोठमोठे होर्डिंग लावले आहेत.

तुळजाभवानी ट्रस्टच्या माध्यमातून जुन्नर (पुणे) येथील हबशी महालाचा विकास !

वास्तविक हिंदूंच्या मंदिरांचा निधी हा हिंदु धर्माच्या कार्यासाठीच व्यय व्हायला हवा. असे असतांना स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षांतील सरकारांनी केवळ हिंदूंच्या असंख्य मंदिरांचे सरकारीकरण करून मंदिरांची संपत्ती अधार्मिक गोष्टींवर उधळली आहे.

‘लोक अदालतीं’तून पुण्यातील ग्रामपंचायतींकडे १६ कोटी महसूल जमा !

‘लोक अदालती’तून महसूल जमा झाला, ही गोष्ट चांगली असली, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी का आहे ? हेही शोधले पाहिजे आणि त्यावर उपाययोजना काढायला हवी.

टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग यांचे निधन !

टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग यांचे ८ डिसेंबर या दिवशी निधन झाले. तेलंग यांनी ३ दशके टाटा मोटर्समध्ये सेवा केली आहे. ते वर्ष २०१२ मध्ये निवृत्त झाले होते.

‘जादूटोणाविरोधी कायद्याची’ प्रभावी कार्यवाही करावी ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यवाही समितीने कामकाजाला गती देऊन राज्यात ‘जादूटोणाविरोधी कायद्याची’ प्रभावी कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विज्ञापन फलकांचा दंड न भरल्यास दंडाच्या रकमेची वसुली मिळकत करातून होणार ! – विजय लांडगे, उपायुक्त, आकाशचिन्ह आणि परवाना विभाग

अनधिकृत विज्ञापन फलक आणि कमानी काढण्यासाठीचा प्रशासनाचा होणारा व्यय संबंधित व्यक्तीकडून किंवा ज्या जागेत फलक आहे त्या मालकाकडून वसूल करणार !