‘एस्.आर्.ए.’च्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यासह पत्नीविरुद्ध गुन्हा नोंद !

पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव कार्यरत होते. त्यांच्याकडे वैध उत्पन्नापेक्षा अधिक १ कोटी ३८ लाख ७४ सहस्र रुपये बेहिशोबी मालमत्ता आढळून आली होती.

पुणे शहरातील प्रमुख रस्ते स्वच्छ करण्यासाठीचा व्यय १०० कोटी रुपयांनी वाढला !

पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांचे झाडणकाम यांत्रिकीकरणाद्वारे करण्यासाठी महापालिकेने ५ वर्षांसाठी ६० कोटी रुपयांची निविदा काढली होती. त्या निविदेमध्ये अन्य तांत्रिक गोष्टींचा समावेश केल्यामुळे ठेकेदारांनी ३८ ते ८० टक्के अधिक दराने निविदा भरल्या होत्या.

शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमीषापोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक !

ऑनलाईन व्यवहारांविषयी नागरिकांनी सावध रहाण्यासह असे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना काढणे आवश्यक !

पुणे येथे ग्रंथालयातील आगीत पुस्तकांची मोठी हानी !

जीवितहानी झालेली नाही. ग्रंथालयामध्ये आग नेमकी का लागली ? याचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

कसबा मतदारसंघात ब्राह्मण उमेदवार हवा ! – अतुल भगरे, ज्योतिषाचार्य

‘ब्राह्मण महासंघा’चे अध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांनीही ब्राह्मण उमेदवाराची मागणी केली, तसेच राज्यातील किमान ३० मतदारसंघांमध्ये ब्राह्मण समाजाचे बहुमत आहे.

‘आर्.टी.ई.’ अनुदान संमतीसाठी लाच घेणारी महिला अटकेत !

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आर्.टी.ई. अंतर्गत) शाळांना अनुदान देण्यात येते. या अनुदान संमतीसाठी १२ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या प्राथमिक शिक्षण संचालनालयातील सुनीता माने या मुख्य लिपिक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.

अमली पदार्थांच्या पडताळणी प्रक्रियेची पूर्तता न केल्याने ८ आरोपींना जामीन

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आरोपी असलेल्या अमली पदार्थांच्या निर्मिती प्रकरणात उच्च न्यायालयाने ८ आरोपींना जामीन संमत केला आहे. अमली पदार्थ जप्तीची कारवाई केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात सादर केलेले अमली पदार्थांचे नमुने न्याय…

फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड) येथील शाळेमध्ये २ अल्पवयीन मुलींशी धर्मांधाचे अश्लील कृत्य !

अशा वासनांधांना शरीयतप्रमाणे हात-पाय तोडण्याची कठोर शिक्षा करावी, असे वाटले तर चूक ते काय ?