मतदारसूचीमध्‍ये मृत म्‍हणून नोंद असलेल्‍या आजींनी मतदानाचा हक्‍क बजावला !

मतदारसूची कशा सिद्ध केल्‍या जातात, त्‍याचे उदाहरण !

राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांचा पुणे येथे सन्मान !

राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी नारदीय कीर्तन परंपरेच्या शैलीमध्ये अनेक विषयांवर कीर्तन करून इंग्लडमधील मराठी आणि हिंदी भाषेतील रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कार्तिकी वारी सोहळ्यासाठी आळंदी देवस्थानाची सिद्धता अंतिम टप्प्यात !

कार्तिकी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून आळंदीत येणार्‍या भाविकांना दर्शन मंडपात खिचडी प्रसाद, चहा, केळी आणि पिण्याच्या पाण्याची सेवा विनामूल्य दिली जाणार आहे. भाविकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि मंदिर परिसरात चोर्‍या होऊ नये, यासाठी देवस्थानाच्या व्यवस्थापनाने ९० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

पुणे येथे शाळेतील वादातून वर्गातच ९ वीतील विद्यार्थ्यावर प्राणघातक आक्रमण !

या घटनेवरून लहान मुलांवर साधनेचे आणि धर्मशिक्षणाचे संस्कार करण्याचे महत्त्व लक्षात येते !

‘पी.एम्.आर्.डी.ए.’मध्ये कामाच्या वेळेत भ्रमणभाष वापरण्यास बंदी ! – आयुक्तांचा निर्णय

पी.एम्.आर्.डी.ए. प्रशासनाकडून महिन्यापूर्वीच नव्या आस्थापनाला कंत्राटी कर्मचार्‍यांचा ठेका देण्यात आला आहे. त्यातील नियम आणि अटी यांमध्ये भ्रमणभाष वापरण्यावर बंदी असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

राहुल गांधी यांना २ डिसेंबरला न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याचे आदेश

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याविषयी अवमानकारक वक्‍तव्‍य केल्‍याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुणे येथील विशेष न्‍यायालयात १८ नोव्‍हेंबरला उपस्‍थित रहाण्‍याचे समन्‍स बजावण्‍यात आले होते;…

लाल बसने (‘एस्.टी.’ने) प्रवास करणार्‍यांच्‍या संख्‍येत पुणे विभागात ५० सहस्रांनी वाढ !

जनतेला सवलतींच्‍या सुविधा देणारे; पण प्रवासाची सोय न करणारे असंवेदनशील एस्.टी. महामंडळ काय कामाचे ?

चतुर्थीच्‍या दिवशी लाखो भाविकांनी श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्‍नहराचे दर्शन घेतले !

अष्‍टविनायकांतील मुख्‍य स्‍थान असलेल्‍या श्री क्षेत्र ओझर येथील मंदिरामध्‍ये चतुर्थीनिमित्त महाआरती करण्‍यात आली. पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत रांगेत अनुमाने ५० सहस्र भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

आळंदीत कार्तिकी वारीच्‍या दर्शनबारीसाठी भूमी अधिग्रहण करण्‍याचा आदेश !

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्‍या संजीवन समाधी दिनानिमित्त आळंदीत ४ ते ५ लाख वारकरी कार्तिकी वारीत आळंदीत सहभागी होतात…

हिंदु असल्‍याची लाज वाटत असेल, तर शरद पवारांनी ते हिंदु नाहीत, असे सांगावे ! – किरीट सोमय्‍या

अन्‍य धर्मियांचे लांगूलचालन करणार्‍या राजकारण्‍यांना या निवडणुकीत त्‍यांची जागा दाखवून द्यायला हवी !