‘क्राईम पेट्रोल’ मालिकेमध्ये आफताब पूनावाला हिंदु दाखवणार्‍या ‘सोनी टीव्ही’वर बंदी घालण्याची हिंदूंची मागणी !

लव्ह जिहादच्या प्रकरणाला वेगळे वळण देऊन त्या घटनेची दाहकता अल्प करणार्‍या वाहिन्या हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. या वाहिन्यांमध्ये सत्य सांगण्याचे धारिष्ट्य नाही का ? अशा वाहिन्यांवर भविष्यात हिंदूंनी बहिष्कार घातल्यास चूक ते काय ?

कर्णावती (गुजरात) येथील ‘कार्निव्हल’मध्ये ‘सांताक्लॉज’ बनून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत धर्मांतराचा प्रयत्न

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर वाद आणि हाणामारी !

तेलंगाणा येथे भगवान अय्यप्पाविषयी अश्‍लाघ्य वक्तव्ये करणार्‍या नास्तिकतावादी नेत्याला भक्तांकडून चोप !  

हल्ली कुणीही उठतो आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांवर टीका करतो. हे थांबवायचे असेल, तर कठोर प्रावधान असलेला ईशनिंदाविरोधी कायदा अस्तित्वात आणणे आवश्यक !

धर्मांतराच्या निषेधार्थ हिंदु समाजाच्या वतीने आटपाडी (सांगली) येथे मोर्चा !

आटपाडी, जिल्हा सांगली येथील वरद रुग्णालय येथे धर्मांतराचा प्रयत्न करणारे संजय गेळे आणि त्यांची पत्नी अश्विनी गेळे यांच्या कारभाराचे अन्वेषण करावे, त्यांच्या संपत्तीचे अन्वेषण व्हावे, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यांसाठी हिंदु समाजाच्या वतीने ३० डिसेंबरला येथे मोर्चा काढण्यात आला.

सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे १ जानेवारीला ‘लव्हजिहाद’, धर्मांतर आणि गोहत्या विरोधी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ !

‘धर्मांतर’, ‘लव्हजिहाद’, तसेचगोहत्या रोखण्यासाठी कोल्हापूर येथे सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, १ जानेवारी २०२३ या दिवशी सकाळी १० वाजता ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

वडोदरा येथील विश्‍वविद्यालयात ३ दिवसांत २ वेळा झाले नमाजपठण

विहिंपकडून हनुमान चालीसाचे पठण करून विरोध

धर्मशिक्षणाची अपरिहार्यता !

विविध प्रकारच्या जिहादची टांगती तलवार हिंदूंच्या डोक्यावर आहेच. धर्मच त्यातून आपल्याला तारू शकतो, हे लक्षात घेऊन धर्माचरण करायला हवे. धर्मशिक्षण घेतलेला प्रत्येक हिंदूच धर्मावरील आघातांचा सामना करू शकतो. यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षित होऊन धर्मरक्षणाचे कर्तव्य पार पाडणे, हेच कालसुसंगत ठरेल !

पुणे येथे तरुणाईला उद्ध्वस्त करणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजन !

सहस्रो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करून प्रशासन काय साध्य करत आहे ? अशा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती न मिळण्यासाठी प्रयत्न करून हा नियोजित कार्यक्रम रहित करण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा !

बरेली (उत्तरप्रदेश) येथील सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांकडून करवून घेतली जात होती ‘मेरे अल्ला’ प्रार्थना !

मदरसे किंवा चर्च येथे ‘हे श्रीकृष्णा’ अशा प्रकारची प्रार्थना कधीतरी करवून घेतली जाईल का ?

नागपूर येथील हिंदु जनसंघर्ष मोर्च्यातील मान्यवरांचे विचार !

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू !