वडोदरा येथील विश्‍वविद्यालयात ३ दिवसांत २ वेळा झाले नमाजपठण

विहिंपकडून हनुमान चालीसाचे पठण करून विरोध

वडोदरा (गुजरात) – येथील एम्.एस्. विश्‍वविद्यालयात गेल्या ३ दिवसांत २ वेळा नमाजपठण करण्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याविरोधात विश्‍व हिंदु परिषदेने हनुमान चालीसाचे पठण केले.

या विश्‍वविद्यालयाचे प्रवक्ते त्रिवेदी यांनी म्हटले की, विश्‍वविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात येईल. त्यांना विश्‍वविद्यालयाला धार्मिक आखाडा न बनवण्यास सांगितले जाईल. (विश्‍वविद्यालयाने समुपदेशन हिंदु विद्यार्थ्यांना नव्हे, तर मुसलमान विद्यार्थ्यांना करावे. अशा समुपदेशनाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही, हेही तितकेच खरे ! – संपादक)