धर्मांतराच्या निषेधार्थ हिंदु समाजाच्या वतीने आटपाडी (सांगली) येथे मोर्चा !

मोर्चामध्ये बोलताना मान्यवर
मोर्चामध्ये सहभागी हिंदू
मोर्चामध्ये सहभागी हिंदू

आटपाडी (जिल्हा सांगली) – येथील वरद रुग्णालय येथे धर्मांतराचा प्रयत्न करणारे संजय गेळे आणि त्यांची पत्नी अश्विनी गेळे यांच्या कारभाराचे अन्वेषण करावे, त्यांच्या संपत्तीचे अन्वेषण व्हावे, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यांसाठी हिंदु समाजाच्या वतीने ३० डिसेंबरला येथे मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी संजय गेळे यांना अटक केली असून त्यांच्या पत्नीला अटक झालेली नाही.