कोल्हापूर,२७ डिसेंबर (वार्ता.) – ‘धर्मांतर’, ‘लव्हजिहाद’, तसेचगोहत्या रोखण्यासाठी कोल्हापूर येथे सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, १ जानेवारी २०२३ या दिवशी सकाळी १० वाजता ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. हा मोर्चा माधुरी बेकरी-बिंदू चौक येथून प्रारंभ होणार आहे. यानंतर मिरजकर तिकटी, महाद्वार रस्ता, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि भवानी मंडप येथे त्याची समाप्ती होईल.या मोर्च्यात कोल्हापूर जिल्ह्यातून संत,धर्माचार्य, संप्रदायाचे प्रमुख, हिंदुसंघटना आणि विविध ज्ञाती समाज सहभागी होणार आहेत, अशी माहिती जनआक्रोश मोर्चा समितीच्या वतीने देण्यात दिली. यासंदर्भात कोल्हापूर येथील हिंदू एकता कार्यालय येथे संयुक्त हिंदुत्ववादी संघाच्या वतीने आयोजित बैठकीला श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, सेवाव्रत प्रतिष्ठान, पतित पावन संघटना, हिंदू एकता आंदोलन, हिंदूमहासभा आदी विविध संघटना, तरुण मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, श्री.आशिष लोखंडे, श्री.शिवानंद स्वामी, श्री.पराग फडणीस, श्री. मधुकर नाझरे,श्री. संभाजी(बंडा)साळुंखे, श्री.भास्कर कोरवी, श्री.राहुल कदम, श्री.राजू यादव, श्री.सचिन तोडकर, श्री.बापू वडगावकर, श्री. नितीन काळे, श्री.प्रमोद सावंत, श्री.जयवंत निर्मळ, श्वेता कुलकर्णी, किशोरी स्वामी, विद्या बनसोडे, सुप्रिया दळवी यांसह अन्य उपस्थित होते.