पुणे – येथील ड्रोम एरिना, खराडी पुणे येथे ३१ डिसेंबर या दिवशी तरुणाईला उद्ध्वस्त करणार्या समाजविघातक ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलला अनेक वेळा विरोध करूनही राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून जनतेच्या रोषाच्या विरोधात जाऊन अनुमती दिली जाते. या कार्यक्रमाला का यावे ? हे सांगण्यासाठी ‘अनलिमिटेड लिकर’ म्हणजेच अमर्यादित मद्य असे स्पष्टपणे अधोरेखित केलेले विज्ञापन देण्यात आले आहे. सांस्कृतिक पुणे अशा कार्यक्रमामुळे वारंवार अपकीर्त होत आहे, तरीही पाश्चात्त्य संस्कृतीच्या अश्लील, नशायुक्त कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळत आहे.
संपादकीय भूमिकासहस्रो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणार्या कार्यक्रमांचे आयोजन करून प्रशासन काय साध्य करत आहे ? अशा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती न मिळण्यासाठी प्रयत्न करून हा नियोजित कार्यक्रम रहित करण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा ! |