Hindu Conversion In UP : उत्तरप्रदेशातील रायबरेली आणि सीतापूर येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतर : तिघांना अटक !

अटक करण्यात आलेले आरोपी

रायबरेली (उत्तरप्रदेश) – रायबरेलीतील मिल एरिया परिसरातील पोलिसांनी धर्मांतर प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. महिला आणि निष्पाप मुले यांना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप आहे. मिल परिसरातील दिघिया येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून प्रार्थनासभा आयोजित केली जात होती. हे लोक सर्वत्र फिरून हिंदु धर्माच्या लोकांना पैसे आणि इतर प्रलोभने देऊन प्रार्थनासभांना बोलावत होते आणि त्यांना ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास सांगत होते. (कथित सर्वधर्मसमभाववाले, साम्यवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या या धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या कारवाया दिसत नाही किंवा ते त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

१. क्षेत्र अधिकारी अमित सिंह यांनी सांगितले की, या धर्मांतराच्या प्रकरणी मिल क्षेत्र पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एका पुरुषासह  दोन महिलांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आणि नंतर त्यांना अटक केली.

२. सीतापूरमध्ये धर्मांतराच्या दुसर्‍या एका प्रकरणात पोलिसांनी पाद्री सुरेश चंद्रा यांच्यासह १२ जणांना कह्यात घेतले. (पाद्य्राचे नाव सुरेश चंद्रा कसे ? बाटगे धर्मांतर करून ख्रिस्ती होतात; मात्र पूर्वीचे हिंदु नाव तसेच ठेवतात; कारण त्यांना हिंदूंचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करणे सोपे जाते ! – संपादक) बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अनुज भदौरिया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलीस या प्रकरणी पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशामध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजप सरकार असतांनाही तेथे ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करण्याइतपत उद्दाम झाले आहेत. यावरून त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी कायद्यांची कठोर कार्यवाही आवश्यक आहे, हेच दिसून येते !