Chhattisgarh Hindu Conversion Case : छत्तीसगडमध्ये हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर : २ पाद्रयांसह ७ ख्रिस्त्यांना अटक !

रायपूर – छत्तीसगडच्या २ शहरांमध्ये हिंंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणारी ख्रिस्त्यांची धर्मांतर करणारी टोळी हिंदु संघटनांनी उघड केली. राजधानी रायपूर आणि बलरामपूर येथे प्रार्थनेच्या नावाखाली चालू असलेला ख्रिस्ती धर्मांतराचा डाव हिंदु संघटनांनी हाणून पाडला. या प्रकरणी पोलिसांनी २ पाद्रयांसह ७ ख्रिस्त्यांना अटक केली आहे. (विदेशी निधीच्या बळावर ख्रिस्ती मिशनरी भारतातील गरीब हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करत असल्याच्या अनेक घटना प्रतिदिन उघडकीस येत आहेत; पण ते रोखण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना केल्याचे ऐकिवात नाही. हे रोखण्यासाठी सरकारने देशात धर्मांतरविरोधी कायदा लागू करणे आवश्यक ठरले आहे ! – संपादक)

१. रायपूरमधील मितान विहार कॉलनीत बलपूर्वक धर्मांतर केले जात असल्याची माहिती बजरंग दलासह हिंदु संघटनांना मिळाली होती. हिंदु संघटनांनी याविषयी पोलिसांना सूचित केले.

२. रायपूरचे पोलीस उपायुक्त लखन पटेल पोलीस पथकांसह घटनास्थळी पोचले. तेथे एका घरातून धर्मांतरासाठी आणलेल्या १० लोकांना पोलिसांनी बाहेर काढले. तसेच पोलसांनी धर्मांतर करणार्‍या टोळीतील काही जणांना कह्यात घेतले.

३. पोलिसांनी छत्तीसगड धार्मिक स्वातंत्र्य कायद्याच्या कलम ४ च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

४. हिंदु संघटनांनी आरोप केला आहे की, या भागात बर्‍याच काळापासून ख्रिस्त्यांकडून धर्मांतर चालू आहे. येथे प्रार्थनेच्या नावाखाली पाद्री गरीब आणि असुरक्षित हिंदु लोकांना आमिषे दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

५. बलरामपूर जिल्ह्यातील सरूत गावात धर्मांतराची अशीच आणखी एक घटना उघडकीस आली आहे. स्थानिकांचा आरोप आहे की, एक पाद्री आणि त्याचे सहकारी गरीब हिंदूंना पैशांचे आमीष दाखवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करत होते. या प्रकरणी त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

६. पोलिसांनी धर्मांतर चालू असलेल्या घरावर धाड घातली आणि एका पाद्रयासह ४ जणांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बायबल आणि ख्रिस्ती पंथाचे प्रचारसाहित्य जप्त केले.

७. दोन्ही प्रकरणांमध्ये अन्वेषण चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या २ घटनांमुळे छत्तीसगडमध्ये धर्मांतराचे सूत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात मोठ्या प्रमाणात धर्मांतराचे प्रकार घडले आहेत, ज्यामध्ये मिशनर्‍यांनी आदिवासींसह गरीब हिंदूंना धर्मांतर करण्यास प्रलोभन दाखवले आहे.

संपादकीय भूमिका

भारतभर ख्रिस्त्यांच्या टोळीकडून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रकार वाढले आहेत. हे रोखण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई आवश्यक !