|

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नाविषयीचे अचूक भाकीत करणारे पाद्री बँडन डेल बिग्स यांनी आता अमेरिकेत १० रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप येईल आणि त्यात १ सहस्र ८०० लोकांचा मृत्यू होईल, असे भाकीत वर्तवले आहे. पाद्री बिग्स यांनी दावा केला की, देवानेच त्यांना असे दाखवले आहे.
पाद्री बिग्स यांनी सांगितले की, या भूकंपाचा परिणाम न्यू माद्रिद फॉल्ट लाईनवरील संपूर्ण भागावर होईल. या भागामध्ये मिसूरी, अर्कांसस, टेनेसी, केंटकी आणि इलिनॉय प्रांत अंतर्भूत आहेत. आहे. हा भूकंप इतका धोकादायक असेल की, सर्व घरे उद्ध्वस्त होतील. तसेच मिसिसिपी नदी दुसर्या दिशेने वाहू लागेल.
भूगर्भशास्त्रज्ञांनी फेटाळला दावा
पाद्री बिग्स यांच्या भविष्यवाणीवर अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, १० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप होणे शक्य नाही. भूकंपाची तीव्रता ‘फॉल्ट’च्या (पृथ्वीच्या भूपृष्ठाला गेलेली तडा) लांबीवरून ठरवली जाते. फॉल्ट लाइन जितकी लांब असेल तितकी भूकंपाची तीव्रता अधिक असेल. सध्या जगात कुठेही असा कोणताही फॉल्ट नाही, जो १० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप घडवू शकतो.
संपादकीय भूमिकाएखाद्या हिंदु संताने नैसर्गिक आपत्तींविषयी असा दावा केल्यावर त्यावर टीका करणारे बुद्धीप्रामाण्यवादी आता गप्प का ? |
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक