संभाजीनगर – दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ भोजनाची मागणी (ऑर्डर) करणार्यांची संख्या वाढली आहे. अनेक व्यावसायिकांनी सामाजिक माध्यमांवर ‘पेज’ चालू केले आहेत. त्याचाच अपलाभ घेत सायबर गुन्हेगारांनी अनेक उपाहारगृहांचे बनावट ‘पेजेस’ सिद्ध करून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ‘जून मासापर्यंत अग्रवाल आणि अन्य एका उपाहारगृहाच्या नावाने जवळपास ४० हून अधिक जणांची फसवणूक झाली आहे. नागरिकांनी ‘ऑनलाईन’ भोजनाची मागणी करतांना ‘पेज’, संपर्क क्रमांक यांची खात्री करावी. उपाहारगृहचालक तुमची वैयक्तिक माहिती मागत नाहीत, तसेच ‘ओटीपी’ विचारत नाहीत. त्यामुळे सतर्क रहावे’, असे आवाहन उपाहारगृह व्यावसायिक अंकित अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केले.