मुंबई – कोविन अॅपद्वारे नोंदणी करून परराज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये लसीकरणासाठी येत असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की,
१. नगर जिल्ह्यातील घुलेवाडी केंद्राला लसीचे ४०० डोस प्राप्त झाले होते. तेथे लस घेण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यांतून १८० लोक आले. यात भाग्यनगर येथूनही काही जण आले होते.
२. महाराष्ट्र सरकारने लसीकरणासाठी राज्य सरकारच्या स्वतंत्र ‘अॅप’ला अनुमती द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.