तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पावित्र्यासह पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक !

विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी यात्रेकरूंनी केवळ पर्यटनासाठी म्हणून जाणे, तेथे जाऊन प्रदूषण वाढवण्यासह तेथील पावित्र्य नष्ट होण्यास हातभार लावणे, आदी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचा परिणामच !

दक्षिण मुंबईतील हवा देहलीपेक्षा अधिक विषारी !

देहलीपेक्षा दक्षिण मुंबईतील हवा अधिक प्रदूषित झाल्याचे पडताळणीतून समोर आले आहे. मुंबईतील सध्याच्या वातावरणामुळे श्वसनाचे आजार असलेल्यांच्या श्वासाच्या समस्येत वाढ होते.

प्रदूषणावर उतारा !

गेल्या दीड-दोन शतकांत मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्यासाठी आता केले जाणारे प्रयत्न हे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखे आहेत. त्याचा किती परिणाम होणार ? हा येणारा काळच ठरवील.

प्रदूषित देहली !

सर्व प्रकारच्या प्रदूषणाविषयी जनजागृती करून त्यावरील उपायांमध्ये जनतेचा सहभाग अधिकाधिक करून घ्यावा. राजकीय इच्छाशक्ती दाखवून उपाययोजनांची कठोरपणे कार्यवाही करणे आणि पर्यावरणपूरक जीवनपद्धत बनवणे आवश्यक आहे.

देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर !

भारताची राजधानीच प्रदूषित असेल, तर अन्य शहरांची स्थिती काय असेल, याची कल्पना येते ! या स्थितीला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

देहलीत २ दिवसांची दळणवळण बंदी लागू करायची का ? – सर्वोच्च न्यायालय

देहलीतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकार काय करत आहे ? याविषयी सरकारने एक आपत्कालीन धोरण सिद्ध करावे. देहलीत २ दिवसांची दळणवळण बंदी लागू करायची का?, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे.

देहलीतील सरकारी आणि खासगी कार्यालयांनी वाहनांचा वापर ३० टक्के न्यून करावा ! – केंद्रीय प्रदूषण मंडळाचा सल्ला

देहलीत वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देहलीतील सरकारी आणि खासगी कार्यालयांना त्यांच्या वाहनांचा वापर किमान ३० टक्क्यांनी न्यून करण्याचा सल्ला दिला आहे.

प्रदूषित यमुनेवरील श्रद्धा !

हिंदु धर्मियांमध्ये एकीकडे धर्माचरण अल्प होत असतांना अजूनही पूजेसाठी काही महिला अशा प्रकारचा भाव ठेवून प्रदूषित नदीमध्ये पूजा करत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. ते नाकारताही येणार नाही. या महिलांचे त्यांच्या भावामुळे देव रक्षण करील, त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवील.

भाजपच्या लोकांनी जाणीवपूर्वक फटाके फोडल्याने देहलीत प्रदूषण वाढले !

राज्यात अनेक ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी फटाके फोडले नाहीत. याविषयी आम्ही मोहीम राबवली होती. भाजपच्या लोकांनी फटाके फोडल्यामुळे रात्री अचानक राज्यतील प्रदूषणाचा स्तर वाढला – पर्यावरण मंत्री गोपाल राय

सर्वच नाही, तर केवळ घातक फटाक्यांवर बंदी ! – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

देशात फटाक्यांवर १०० टक्के बंदी नाही. ती केवळ हानीकारक रसायनांपासून निर्मित फटक्यांवरच आहे. ‘हरित’ फटाक्यांवर नाही. आमच्या आदेशाचे कठोरपणे पालन केले जावे, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने फटक्यांविषयीच्या याचिकेवर सुनावणी करतांना दिले.