भाजपच्या लोकांनी जाणीवपूर्वक फटाके फोडल्याने देहलीत प्रदूषण वाढले !

देहलीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांचा आरोप

कुठल्याही गोष्टीचे राजकीय भांडवल केले नाही, तर ते राजकारणी कसले ?

देहलीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय

नवी देहली – राज्यात अनेक ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी फटाके फोडले नाहीत. याविषयी आम्ही मोहीम राबवली होती. भाजपच्या लोकांनी फटाके फोडल्यामुळे रात्री अचानक राज्यतील प्रदूषणाचा स्तर वाढला, असा आरोप देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

ते पुढे म्हणाले, ‘‘प्रदूषणाचा स्तर हा आणखी एका घटनेमुळे वाढला आहे. देहलीची शेजारी राज्ये असलेल्या पंजाब आणि हरियाणा येथे शेतीची कामे लांबली आहेत. पीक काढून झाल्यावर पुढील पीक घेण्याआधी उरलेला पिकांचा अनावश्यक भाग जाळला जातो. सध्या ही कामे जोरात चालू आहेत. त्यामुळेही निर्माण झालेला धूर देहलीच्या वातावरणात पसरून प्रदूषण वाढले आहे.