रशिया भारतासमवेतचे संबंध अधिक दृढ करणार !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

मॉस्को (रशिया) – रशिया भारतासमवेत राजकीय आणि व्यापारी संबंध अधिक भक्कम करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.

या नव्या धोरणानुसार रशिया मित्र देश नसलेल्या आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या धोकादायक कारवाया रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे रशियाकडून सांगण्यात आले आहे. या वेळी रशियाने भारत आणि चीन यांचा ‘सार्वभौम जागतिक शक्ती केंद्रे’ म्हणून उल्लेख केला.