जलप्रदूषणाचे स्रोत आणि उपाययोजना !

जलप्रदूषण ही गंभीर समस्या गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेली आहे. जलस्रोतांची पडताळणी होतांना जलप्रदूषण करणारे स्रोत शोधून त्यांचा बंदोबस्त केला, तर ही समस्या मुळापासून सुटू शकते.

राजकारणात निवृत्तीचे वय किती ?

अमेरिकेसारख्या देशात एकदा मोठी पदे (अध्यक्ष) भोगल्यास वयस्कर व्यक्ती निवृत्त होतात, तसेच तरुण नेत्यांना वाव देतात. असे अनुकरण आपण का करू नये ?

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक माध्यमांद्वारे आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार्‍यांविषयी तीव्र असंतोष व्यक्त केला.

देशातील मोगल आणि इंग्रज यांची रस्त्यांना दिलेली नावे पालटावीत !  

स्वातंत्र्यपूर्व आणि नंतर देशद्रोह करणार्‍यांचीही नावे हटवून हुतात्मा चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आदी देशभक्तांची नावे ठेवण्यात यावीत.  

अभिनेत्री कंगना राणावत यांचे सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या मुक्तीच्या अभियानाला समर्थन !

आपला देश, संस्कृती आणि वारसा यांच्या संवर्धनासाठी आपण उभे रहात नाही, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे, असे ट्वीट अभिनेत्री कंगना राणावत यांनी केले आहे.

सर्वविनाशी दारू ! 

राष्ट्र सामर्थ्यशाली होण्यासाठी सर्वनाशाचे मूळ ठरणार्‍या दारूवरच बंदी आणणे उचित ठरेल. तसे झाल्यास तीच खर्‍या अर्थाने भविष्यातील राष्ट्राच्या सर्वंकष विकासाची चाहूल असेल !

ऐतिहासिक ‘विनोद’ नकोत !

लोकहो, ऐतिहासिक मालिका केवळ पाहून सोडून देऊ नका किंवा त्यांतील पात्रांची टर उडवू नका. त्या व्यक्तीरेखांमुळे भारताचा गौरवशाली इतिहास घडला आहे, हे विसरू नका.

लसीकरणाचा भारतीय इतिहास

मित्रा देसाई यांचे नवीन पुस्तक म्हणजेच ‘Shitala : How India enabled vaccination’. या पुस्तकातून भारतामध्ये लसीकरणाचे तंत्रज्ञान किती पुरातन आहे, याची आश्‍चर्यचकित करणारी माहिती रोचक पद्धतीने मिळते.

अजूनही शौचालयेच ?

‘देशातील १५ सहस्रांपेक्षा अधिक शाळांमध्ये शौचालये नाहीत’, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

प्रथमोपचार शिकून जीवदान द्या !

भीषण आपत्काळात विविध आपत्तींमध्ये कुणाला इजा किंवा दुखापत झाल्यास त्याच्यावर प्राथमिक उपचार कसे करावेत, रुग्णांना कसे हाताळावे याचे सर्वांनीच प्रशिक्षण घ्यावे !