भारताचे पंतप्रधान मोदी यांना वाटले, तर ते पाकिस्तान क्रिकेट मंडळ बंद करू शकतात ! – पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा

जर असे असेल, तर भारताच्या पंतप्रधानांनी हे काम करावे, असेच भारतियांना वाटेल ! – संपादक

डावीकडून पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा आणि पंतप्रधान नरेद्र मोदी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (‘पीसीबी’चे) ५० टक्के कामकाज आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या (‘आयसीसी’च्या) निधीवर चालते. ‘आयसीसी’चा निधी म्हणजे त्याने आयोजित केलेल्या स्पर्धा अन् त्या स्पर्धांमधून येणारा पैसा त्यांच्या सदस्य देशांच्या क्रिकेट मंडळांमध्ये वितरित केला जातो. आयसीसीला मिळणारा ९० टक्के निधी हा केवळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (‘बीसीसीआय’कडून) येतो. एक प्रकारे भारताचे पैसे पाकिस्तान क्रिकेट चालवत आहे. जर उद्या भारतीय पंतप्रधानांना वाटले की, ‘आम्ही पाकिस्तानला निधी देणार नाही’, तर पीसीबी कोलमडू शकते, असे विधान पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी केले आहे. रमीझ राजा यांनी सिनेटच्या स्थायी समितीच्या बैठकीत हे वक्तव्य केले आहे.