पंतप्रधान मोदी यांनी व्हॅटिकनमध्ये घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी व पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी (इटली) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांनी येथे ख्रिस्त्यांच्या कॅथॉलिक चर्चचे  सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या वेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर हेदेखील उपस्थित होते.

‘पोप फ्रान्सिस यांच्याशी अतिशय प्रेमळ भेट झाली. मला त्यांच्याशी अनेक सूत्रांवर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि त्यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिले’, असे पंतप्रधान मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भेटीनंतर सांगितले. या भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी यांची भेट घेतली होती. दोन्ही पंतप्रधानांमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली.