
नवी देहली – रशियाने युक्रेनच्या विरोधात छेडलेले युद्ध हे भारतात मोगलांनी राजपूतांच्या विरोधात घडवलेल्या नरसंहारासारखे आहे, असे विधान युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी केले. युक्रेनमधील खारकीव येथे रशियाने केलेल्या आक्रमणात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. पोलिखा यांनी नवी देहलीतील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्याच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त केला. त्या वेळी ते बोलत होते. ‘भारताकडून युक्रेनला मानवतावादी साहाय्य देण्याविषयी चर्चा झाली. हे साहाय्य देण्यासाठी आम्ही भारताचे आभारी आहोत’, असेही ते या वेळी म्हणाले.
Like Mughals’ massacre of Rajputs: #Ukraine envoy Igor Polikh on #Russia‘s invasion#UkraineRussiaWar #UkraineUnderAttack #UkraineRussia #RussiaUkraine #RussiaInvadesUkraine #RussiaUkraineWar pic.twitter.com/ECX80JtgWf
— Oneindia News (@Oneindia) March 2, 2022
डॉ. पोलिखा पुढे म्हणाले की, आम्ही मोदी यांच्यासह सर्व प्रभावशाली जागतिक नेत्यांना पुतिन यांना रोखण्यासाठी सर्व साधनांचा वापर करण्यास सांगत आहोत. रशियाने आता नागरी भागातही गोळीबार चालू केला आहे.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई