|

दरियाबाद (उत्तरप्रदेश) – बाराबंकी जिल्ह्यातील दरियाबाद येथील गुलचप्पा कला या गावात गुड्डू रावत या युवकाने ‘योगी-मोदी झिंदाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे गावातील माजी सरपंच अलीम याच्या सलीम आणि अदीम या २ मुलांनी रावत यांच्यावर जीवघेणे आक्रमण केले. यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. रावत यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
१. उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात काही लोकांमध्ये याविषयी चर्चा चालू होती. त्या वेळी पान मसाल्याच्या टपरीवर बसलेले गुड्डू रावत यांनी ‘योगी-मोदी झिंदाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या.
२. २८ फेब्रुवारीला सायंकाळी रावत घरी जात असतांना सलीम आणि अदीम यांनी रावत यांना बेदम मारहाण केली अन् त्यांना तशाच अवस्थेत तेथे ठेवून ते पसार झाले.
३. याची माहिती मिळताच रावत यांच्या कुटुंबियांनी संबंधितांच्या अटकेची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले आहे.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !