भारताने युक्रेनमधून सुखरुप बाहेर काढल्याने पाकिस्तानी तरुणीने मानले पंतप्रधान मोदी यांचे आभार !

पाक धर्माच्या नावावर प्रतिदिन तेथील निष्पाप अल्पसंख्य हिंदूंची हत्या करतो, तर भारत मानवतेच्या भूमिकेतून पाकच्या नागरिकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढतो ! तरीही तथाकथित आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना भारतालाच ‘असहिष्णु’ ठरवातात ! – संपादक

पाकिस्तानी तरुणी अस्मा शफीफ (डावीकडे) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (उजवीकडे)

नवी देहली – भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासह अन्य देशांच्याही नागरिकांना बाहेर काढले आहे. यांमध्ये अस्मा शफीफ या पाकिस्तानमधील तरुणीचाही समावेश आहे. यासाठी तिने भारतीय दूतावास आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. याविषयीचा एक व्हिडिओ तिने प्रसारित केला आहे. लवकरच ती तिच्या कुटुंबाला भेटणार आहे.

९ बांगलादेशी नागरिकांची मुक्तता केल्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार !

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (डावीकडे) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (उजवीकडे)

भारताने युक्रेनमधून भारतीय नागरिकांसमवेत अन्य देशांच्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. यात ९ बांगलादेशी नागरिकांचाही समावेश आहे. या साहाय्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रयत्न केले जात होते. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांच्याशी दूरभाषद्वारे चर्चा करून नागरिकांना बाहेर काढण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती.