बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील श्री हनुमान मंदिराच्या परिसरात ७० वर्षीय पुजार्‍याची धारदार शस्त्राने हत्या !

उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासारखे प्रखर हिंदुत्वनिष्ठ सत्तेत असतांना तेथे साधू, संत-महंत, पुजारी यांची हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. या सर्वांच्या सुरक्षेसाठी सरकारने कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे !

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेंनी उपकारागृहातून भ्रमणभाषद्वारे अधिवक्त्यांशी संपर्क केल्याचे उघड

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे सध्या पारनेर उपकारागृहात असून तेथील २ कोठडीत सापडलेल्या भ्रमणभाषद्वारे त्यांनी काही अधिवक्त्यांशी संपर्क केल्याचे तपासात उघड झाले आहे.

आईला मारल्यामुळे मुलाने केली युवकाची हत्या

समाजातील अराजकता वाढण्यास नैतिकतेचा अभाव हेच कारण आहे, हे लक्षात घेऊन समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !

बलात्काराचा सूड घेण्यासाठी पीडित विवाहितेने पतीसमवेत मिळून केली बलात्कार्‍याची हत्या !

हबीबुल्लाह नावाच्या युवकाने एका विवाहितेवर बलात्कार केला. याचा सूड घेण्यासाठी या विवाहितेने तिच्या पतीच्या साहाय्याने हबीबुल्लाह याची हत्या केली. पोलिसांनी या दांपत्याला अटक केली आहे.

पुणे येथे किरकोळ वादातून भरदिवसा रस्त्यात कोयत्याने वार करून तरुणाची हत्या

औद्योगिक वसाहत चाकण परिसरातील म्हाळुंगे येथे आस्थापनात पाणीपुरवठा करण्याच्या वादातून भरदिवसा रस्त्यात ६ जणांनी मिळून कोयत्याने वार करून हत्या केली.

महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या हत्येचा कट रचणार्‍या काश्मिरी धर्मांधाला अटक

जहांगिर काश्मीरचा रहाणारा असून त्याने जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेकडून यती नरसिंहानंद सरस्वती यांना ठार मारण्याची सुपारी घेतली होती.

सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या आईची हत्या !

कायद्याचे भय नसलेले गुन्हेगार ! पोलीस निरीक्षकांच्या आईच असुरक्षित असतील तर अन्य व्यक्तींच्या सुरक्षेचे काय ?

अमरावती येथे क्षुल्लक वादातून हिंदु तरुणाची हत्या !

जर या घटनेत मुसलमानाची हत्या झाली असती, तर देशात निधर्मींनी आतापर्यंत असहिष्णूतेच्या आरोळ्या ठोकल्या असत्या ! हे असेच चालू राहिले, तर महाराष्ट्राचे बंगाल होण्यास वेळ लागणार नाही.

पुणे येथे पोलीस हवालदाराची हत्या केल्याप्रकरणी गुंडाला अटक

यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक नसल्याचेच दिसून येते. ही दु:स्थिती पालटण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा होणे आवश्यक !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे विक्रम भावे यांना सशर्त जामीन संमत !

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले ‘मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात’ या पुस्तकाचे लेखक तथा हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे यांना ६ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन संमत केला.