रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेंनी उपकारागृहातून भ्रमणभाषद्वारे अधिवक्त्यांशी संपर्क केल्याचे उघड

कारागृहातही सुव्यवस्था राखू न शकणारे पोलीस बाहेर कायद्याचे रक्षण कसे करणार ?

आरोपी बाळ बोठे

नगर – रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे सध्या पारनेर उपकारागृहात असून तेथील २ कोठडीत सापडलेल्या भ्रमणभाषद्वारे त्यांनी काही अधिवक्त्यांशी संपर्क केल्याचे तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात बोठेंना आरोपी केल्यानंतर पोलिसांनी आता त्या अधिवक्त्यांकडे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोठडीत भ्रमणभाष वापरण्यास बंदी आणि न्यायालयाच्या अनुमतीविना अधिवक्त्यांना आरोपीशी संपर्क ठेवता येत नसतांनाही हा संपर्क कसा झाला ? याचा तपास पोलीस करणार असल्याचे सांगण्यात आले. आणखी काही आरोपींनी भ्रमणभाषचा वापर केल्याचे समोर आले आहे.बोठे यांनी ३ संपर्क केल्याचे आढळून आले आहे. त्यांनी कोणत्या अधिवक्त्यांना आणि कशासाठी संपर्क केले ? त्यातून त्यांचे काय बोलणे झाले ? याचा शोध घेणार असल्याची माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली.