गुन्हेगारांना कायद्याचे अथवा पोलिसांचे भय उरलेले नाही, हेच अशा घटना दर्शवतात !

पुणे – येथील औद्योगिक वसाहत चाकण परिसरातील म्हाळुंगे येथे आस्थापनात पाणीपुरवठा करण्याच्या वादातून अतुल भोसले या तरुणाची १४ मे या दिवशी भरदिवसा रस्त्यात ६ जणांनी मिळून कोयत्याने वार करून हत्या केली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले; पण उपचाराच्या वेळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी २ संशयित व्यक्तींना कह्यात घेतले आहे. तसेच ६ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही छायाचित्रण समोर आले असून यामध्ये निर्घृणपणे हत्या केली जात असल्याचे दिसत आहे. (गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित कठोर शिक्षा होऊन त्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे ! – संपादक)
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !
पुणे महापालिका समान आणि पुरेसे पाणीपुरवठा योजनेची ‘श्वेतपत्रिका’ काढणार का ?
खंडणी मागितल्याने ‘क्रेडिट सोसायटी’च्या संचालकांवर गुन्हा नोंद !
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !