मंदिराच्या जवळच आढळल्या दारूच्या बाटल्या आणि ३ पेले !
उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासारखे प्रखर हिंदुत्वनिष्ठ सत्तेत असतांना तेथे साधू, संत-महंत, पुजारी यांची हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. या सर्वांच्या सुरक्षेसाठी सरकारने कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे !

बाराबंकी (उत्तरप्रदेश) – येथील खमौली गावातील श्री हनुमान मंदिरातील पुजार्याची मंदिराच्या परिसरात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. सुरेशचंद्र चौहान (वय ७० वर्षे) असे या पुजार्याचे नाव आहे.
सकाळी नेहमीप्रमाणे लोक दर्शनासाठी श्री हनुमान मंदिरात गेले असता त्यांना पुजारी सुरेशचंद्र चौहान हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांनी लगेचच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पुजारी चौहान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अन्वेषण चालू केले आहे. गावकर्यांनी पोलिसांना सांगितले की, पुजारी सुरेशचंद्र चौहान हे नियामतियापूर येथील परमात्मा यांच्याकडे गेले होते. तेथून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते परत आले. त्यानंतर त्यांनी श्री हनुमानाची पूजाअर्चा केली आणि नंतर मंदिराच्या बाहेर पलंग टाकून झोपी गेले.
Priest found dead inside temple with multiple injuries in UP village | via @IndiaTVNews https://t.co/SyTQGWVQte
— India TV (@indiatvnews) May 26, 2021
यामुळे पोलिसांना संशय आहे की, पुजारी सुरेशचंद्र चौहान हे झोपले असतांनाच त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसराचीही पहाणी केली. त्या वेळी पोलिसांना मंदिरापासून जवळच दारूच्या बाटल्या आणि ३ पेले आढळून आले असून त्यांनी ते कह्यात घेतले आहेत. त्यामुळे मारेकरी तिघे जण असावेत, असाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल ! – पोलीस अधीक्षक
पोलीस अधीक्षक यमुना प्रसाद म्हणाले की, आम्ही या प्रकरणाचे अन्वेषण करत आहोत. अन्वेषणासाठी ३ पथके सिद्ध करण्यात आली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !