पुणे येथे पोलीस हवालदाराची हत्या केल्याप्रकरणी गुंडाला अटक

यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक नसल्याचेच दिसून येते. ही दु:स्थिती पालटण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा होणे आवश्यक !

पुणे, ६ मे – येथील बुधवार पेठ परिसरातील फरासखाना पोलीस ठण्यामधील हवालदार समीर सय्यद यांच्यावर ४ मे च्या रात्री १२ वाजता प्रविण महाजन या गुंडाने चाकूने प्राणघातक आक्रमण केला. घायाळ झालेल्या सय्यद यांचा उपचारांच्या वेळी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी महाजन याला अटक केली आहे. (कायद्याचे रक्षण करणारे पोलिसच असुरक्षित असतील, तर सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार ? – संपादक)