आईला मारल्यामुळे मुलाने केली युवकाची हत्या

सातारा येथील घटना

समाजातील अराजकता वाढण्यास नैतिकतेचा अभाव हेच कारण आहे, हे लक्षात घेऊन समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !

सातारा, २२ मे (वार्ता.) – आईशी भांडण करून तिला मारहाण करणार्‍या ३५ वर्षीय युवकाची अविनाश मल्हारी सावंत यांनी हत्या केली आहे. फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील दाते वस्तीवर ही घटना घडली असून हत्या करणार्‍यास फलटण पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

गणेश सावंत यांनी अविनाश मल्हारी सावंत यांना शेळीचे दूध काढण्यासाठी बोलवले; मात्र तो गेला नाही. या कारणावरून गणेश यांनी चिडून जाऊन अविनाश यांच्या आईशी भांडण करून तिला मारहाण केली. याचा राग मनात धरून अविनाश सावंत आणि त्यांचा एक सहकारी यांनी लोखंडी पाना आणि सत्तूर यांनी वार करून गणेश सावंत यांना जागेवरच ठार केले.