|
हिंदूंचे साधू, संत, महंत, नेते यांच्या संरक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
नवी देहली – देहली पोलिसांनी उत्तरप्रदेशातील गाझियाबादच्या डासना येथील मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या हत्येचा कट रचणार्या महंमद डार उपाख्य जहांगिर याला एका हॉटेलमधून अटक केली आहे. त्याच्याकडून भगवे वस्त्र, पूजेचे साहित्य, हातात बांधायचा लाल दोरा आणि कुंकू जप्त करण्यात आले आहे. जहांगिर काश्मीरचा रहाणारा असून त्याने जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेकडून यती नरसिंहानंद सरस्वती यांना ठार मारण्याची सुपारी घेतली होती. या संघटनेच्या पाकमधील आबिद या एका मोठ्या आतंकवाद्याकडून त्याला ही सुपारी मिळाली होती. जहांगिरकडून १ पिस्तुल, २ मॅगझिन आणि १५ काडतुसेही जप्त करण्यात आली. तो साधूचा वेश परिधान करून मंदिरात प्रवेश करून हत्या करणार होता, असे पोलिसांनी सांगितले. यती नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला होता. यामुळेच त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
डासना के महंत स्वामी #यति_नरसिंहानन्द_सरस्वती_जी की हत्या की साजिश का खुलासा हो गया है. कश्मीर के रहने वाले आरोपी जॉन मोहम्मद डार उर्फ जहांगीर, साधु की वेशभूषा में स्वामी यति नर सिंघम को मारने वाला था.#Muslim #HindusLivesMatter pic.twitter.com/VBx1D5Qzyw
— BharatIdea (@1bharatidea) May 17, 2021
१. आबिद याच्याशी व्हॉट्सअॅपद्वारे जहांगिर संपर्कात होता. आबिद याने त्याला यती नरसिंहानंद यांचा एक व्हिडिओ दाखवून त्यांची हत्या करण्यासाठी भडकावले होते. हत्येसाठी जहांगिर याला पिस्तुल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. हत्या केल्यानंतर पैसे देण्याचेही आश्वासन आबिद याने जहांगिर याला दिले होते.
२. २३ एप्रिल या दिवशी जहांगिर काश्मीरमधून देहलीमध्ये आला होता. त्याची देहलीमध्ये उमर नावाच्या व्यक्तीने रहाण्याची व्यवस्था केली होती. जहांगिर जेव्हा देहलीस जाण्यास निघाला होता त्या वेळी त्याच्या बँक खात्यामध्ये ३५ सहस्र रुपये जमा करण्यात आले होते.
३. पोलीस जहांगिर याची चौकशी करत असून यातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. जहांगिर याला वर्ष २०१६ मध्ये बुरहान वानीला ठार करण्यात आल्यावर सैन्यावर दगडफेक केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. (दगडफेक करणारे पुढे काय करू शकतात, हेच यातून दिसून येते. त्यामुळे अशांच्या विरोधात खटला चालवून त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी प्रयत्न न होणे, ही व्यवस्थेची चूक होती, हे स्पष्ट होते ! – संपादक)
हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रमाणे कट
ऑक्टोबर २०१९ मध्ये गुजरातमधील युसूफ खान आणि हाशिम अली यांनी हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी यांची हत्या केली होती. हे दोघेही भगवे वस्त्र घालून तिवारी यांच्या कार्यालयात त्यांना भेटण्यास गेले होते. त्याच प्रकारे जहांगिर यती नरसिंहानंद सरस्वती यांची हत्या करणार होता, असा स्पष्ट होत आहे.