मुंबई – मुसलमान महिलांची छायाचित्रे त्यांच्या मुल्यासह ‘गिटहब’ या ॲपवर प्रसारित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बेंगळुरू येथून वशाल कुमार या २१ वर्षीय युवकाला, तर उत्तराखंड येथून एका महिलेला कह्यात घेतले आहे. या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलिसांना तत्परतेने कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता, तसेच शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनीही पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले होते. या प्रकरणात टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या दृष्टीने पोलीस चौकशी करत आहेत.