मुंबईतील कोरोनाबाधितांपैकी ८० टक्के रुग्ण ओमिक्रॉनबाधित ! – आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल

डॉ. इक्बालसिंह चहल

मुंबई – येथील कोरोनाबाधित रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण ओमिक्रॉनबाधित आहेत, अशी माहिती राज्याच्या कोरोनाच्या ‘टास्क फोर्स’च्या तज्ञांनी दिल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखतीमध्ये दिली आहे.

चहल पुढे म्हणाले की, असे असले, तरी सध्या ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही. मुंबई महापालिकेने विदेशातून येणार्‍या प्रवाशांचे विलगीकरण करण्यासाठी विषेश मोहीम राबवली आहे. मुंबईच्या कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दरामध्ये २१ डिसेंबरपासून वृद्धी होत आहे. सध्या मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा वृद्धी दर हा १७ टक्क्यांवर पोचला आहे. गेल्या २४ घंट्यांत महाराष्ट्रात ११ सहस्र ८७७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यांपैकी ७ सहस्र ७९२ रुग्ण फक्त मुंबईतील आहेत.