मुंबई – अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांचे केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागामध्ये स्थानांतर करण्यात आले आहे. वानखेडे यांची मुदत संपल्याने त्यांचे स्थानांतर करण्यात आले आहे.
समीर वानखेडे यांचा अमली पदार्थविरोधी विभागातील कार्यकाळ संपला आहे. ३१ डिसेंबरनंतर त्यांना मुदतवाढ न मिळाल्याने ते त्यांच्या भारतीय महसूल सेवेत (आय.आर्.एस्. – इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) परत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.