मुंबई – कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० सहस्रांच्या पुढे गेली, तर मुंबईमध्ये दळणवळण बंदीचा विचार करावा लागेल, असे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, रुग्णसंख्येत तीन-चार पटींनी वृद्धी होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या परिस्थितीवर बोलू शकतात. नवीन नियमानुसार एखाद्या इमारतीतील २० टक्क्यांपेक्षा अधिक घरांमध्ये कोरोनाचे रुग्ण असल्यास संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्यात येणार आहे. ३ जानेवारीला १५ ते १७ वयोगटातील २ सहस्र ५०० मुलांचे लसीकरण झाले आहे.