मुंबई – संयुक्त अरब अमिरातीतून मुंबईत अवैधरित्या सोने घेऊन येणार्या ५ प्रवाशांना मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने अटक केली आहे. या कारवाईमध्ये ४ किलो सोने कह्यात घेण्यात आले असून त्याचे बाजारमूल्य दीड कोटी रुपयांहून अधिक आहे. सीमाशुल्क विभागाच्या ‘मुंबई एअर इंटिलिजन्स युनिट’ने ही कारवाई केली.
त्यांतील दोघे शारजहाहून, तर दोघे अबुधाबीहून विमानाने मुंबईत आले होते. मेटल डिटेक्टरमध्ये हे साडेतीन किलो सोने दिसू नये, यासाठी त्यांनी ते भुकटीच्या स्वरूपात आणले होते.
दुसर्या कारवाईत दुबईहून आलेल्या महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. तिने हे सोने अंतर्वस्त्रात लपवून आणले होते. तिच्याकडून ५४६ ग्रॅम सोने आणि ८६८ ग्रॅम सोन्याची भुकटी कह्यात घेण्यात आली आहे. त्याचे बाजारमूल्य ३८ लाख रुपये आहे.