‘जिओ’ची भ्रमणभाष सेवा ठप्प, ग्राहक त्रस्त

रिलायन्स ‘जिओ’

मुंबई – मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात ५ फेब्रुवारीला दुपारपासून रिलायन्सच्या ‘जिओ’ भ्रमणभाष सेवेचे नेटवर्क ठप्प झाले होते. त्यामुळे भ्रमणभाष आणि इंटरनेट सेवा वापरणार्‍या ग्राहकांची पुष्कळ असुविधा झाली. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत ग्राहकांना जिओ सेवेत व्यत्यय येत होता. ग्राहकांना झालेल्या या त्रासामुळे दोन दिवसांची अमर्याद ‘इंटरनेट सेवा’ विनामूल्य देण्यात आली आहे.