मुंबई महापालिका निवडणुकीनंतर मालमत्ता कर वृद्धी करणार !

महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल

मुंबई – महापालिकेच्या निवडणुकीनंतर मालमत्ता करात वृद्धी करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे. १५ टक्क्यांपर्यंत करवृद्धी होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले की, मालमत्ता करात दर ३ वर्षांनी वृद्धी केली जाते; मात्र कोरोनामुळे गेली २ वर्षे मालमत्ता करात वृद्धी करण्यात आली नव्हती. सध्या कोरोनाचा संसर्ग अल्प होत असल्याने मालमत्ता करात पुन्हा वृद्धी करण्यात येणार आहे. २०२१-२२ या वर्षामध्ये मालमत्ता करातून ७ सहस्र कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते; परंतु ते अल्प करून ४ सहस्र ८०० कोटीवर आणले आहे.