मुंबई – स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अतीदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार चालू होते. आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ‘त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत’, असे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी माध्यमांना सांगितले.