नवाब मलिक यांची ‘ईडी’च्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली !

मलिक यांनी केलेल्या या याचिकेला विरोध करत ‘ईडी’ने त्यांच्याविरोधातील कारवाई आणि त्यांची अटक आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायद्याला अनुसरूनच असल्याचा दावा करत ही याचिका फेटाळून लावण्याची न्यायालयाकडे मागणी केली होती.

राज्यातील शेतकर्‍यांची ३ मास वीज तोडणार नाही ! – ऊर्जामंत्री

शेतकर्‍यांचे हित आणि सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन आगामी ३ मासांसाठी शेतकर्‍यांची वीज तोडण्यात येणार नाही, तसेच ज्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे, त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत् करण्यात येईल.

रझा अकादमीच्या सांगण्यावरून ‘मुहंमद’ चित्रपटावर बंदी; मात्र ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष, हा कोणता ‘राष्ट्र’वाद ? – हिंदु जनजागृती समिती

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वर्ष १९९० मधील काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाविषयी आहे कि भारताच्या फाळणीविषयी’, हे राज्याच्या गृहमंत्र्यांना ठाऊक नसणे, हेच दुर्दैव !

खेळात प्राविण्यप्राप्त व्यक्तीची क्रीडाशिक्षकपदी नियुक्ती करण्याचे नवीन धोरण आणणार ! – कु. अदिती तटकरे, क्रीडाराज्यमंत्री

जागतिक, राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती ! भाजपचे भाई गिरकर यांच्या लक्षवेधीला दिलेले उत्तर !

राज्याच्या गोपनीयतेच्या सुरक्षेसाठी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी ! – शंभुराज देसाई, गृहराज्यमंत्री

राज्यातील ‘फोन टॅपिंग’ची गोपनीय माहिती बाहेर जाणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. फडणवीस यांना ही माहिती कशी मिळाली, याची माहिती घेण्यासाठीच त्यांची चौकशी करण्यात आली.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे ‘आय.एम्.डी.बी.’वरील मानांकन (रेटिंग) अल्प करण्यासाठी चित्रपटाला नकारात्मक ‘रेटिंग’ देणे चालू !

द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला ‘इंटरनेट मुव्ही डेटाबेस’वर अर्थात् ‘आय.एम्.डी.बी.’वर १२ मार्च या दिवशी ‘१० पैकी १०’ असे मानांकन (रेटिंग) होते. हे मानांकन म्हणजे जगभरातील चित्रपटाच्या प्रसिद्धीचे प्रमाण मानले जाते. हे मानांकन जितके अधिक, तितकी त्या चित्रपटाची नोंद जगभरात घेतली जाते.

देवेंद्र फडणवीस यांना आरोपी नव्हे, तर त्यांचा जबाब घेण्यासाठी नोटीस पाठवली ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला दूरभाष ध्वनीमुद्रण प्रकरणी सायबर पोलिसांनी १३ मार्च या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. त्याचे पडसाद १४ मार्च या दिवशी विधानसभेत उमटले.

स्वरक्षणासाठी प्रत्येक महिलेने धर्मशिक्षण अन् स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – कु. शीतल चव्हाण, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

त्रिवेणी शिक्षण संस्थान आणि ‘युनायटेड नारी शक्ती’ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुलुंड येथे आयोजित एका कार्यक्रमात कु. शीतल चव्हाण बोलत होत्या.

‘दाऊदची माणसे वक्फ महामंडळावर बसवण्यात आली आहेत का ?’ – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

वक्फ मंडळावर नियुक्त करण्यात आलेल्या एका पदाधिकार्‍यांचे कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्याशी संबंध आहेत. महाराष्ट्रात बाँबस्फोट घडवणार्‍या दाऊदची माणसे वक्फ महामंडळावर बसवण्यात आली आहेत का ?

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा !

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एका पत्राद्वारे केली.