ललित पाटीलचा होता गुन्ह्यात समावेश !
पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आरोपी असलेल्या अमली पदार्थांच्या निर्मिती प्रकरणात उच्च न्यायालयाने ८ आरोपींना जामीन संमत केला आहे. अमली पदार्थ जप्तीची कारवाई केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात सादर केलेले अमली पदार्थांचे नमुने न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत सादर केले नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यात पडताळणी प्रक्रियेची पूर्तता झाली नसल्याचे नमूद करत न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी जामीनाचा आदेश दिला.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने खेड तालुक्यात ७ ऑक्टोबर २०२० या दिवशी २० किलो मेफेड्रोन (एम्.डी.) अमली पदार्थ पकडले होते. आरोपींनी रांजणगाव येथील एका आस्थापनात १३२ किलो आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे १० ते १५ किलो एम्.डी. अमली पदार्थ सिद्ध केल्याची माहिती समोर आली होती. या गुन्ह्यात ललित पाटीलसह एकूण २२ जणांना अटक करण्यात आली होती. याच गुन्ह्यात ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत होता.
संपादकीय भूमिकाया प्रकरणातील उत्तरदायी अधिकार्यांवर कारवाई होणार का ? |