अभिनेते प्रशांत दामले यांनी १० पैकी १० ‘रेटिंग’ देण्याचे आवाहन केल्याचा सामाजिक माध्यमांतून दावा !
(टीप : आय.एम्.डी.बी. (इंटरनेट मुव्ही डेटाबेस) हा चित्रपटाविषयीचा ऑनलाईन माहितीसंग्रह आहे.)
मुंबई – ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला ‘इंटरनेट मुव्ही डेटाबेस’वर अर्थात् ‘आय.एम्.डी.बी.’वर १२ मार्च या दिवशी ‘१० पैकी १०’ असे मानांकन (रेटिंग) होते. हे मानांकन म्हणजे जगभरातील चित्रपटाच्या प्रसिद्धीचे प्रमाण मानले जाते. हे मानांकन जितके अधिक, तितकी त्या चित्रपटाची नोंद जगभरात घेतली जाते. तथापि १३ मार्च या दिवशी या चित्रपटाविषयी नकारात्मक ‘रेटींग’ देऊन हे मानांकन ८.३ इतके खाली आणण्यात आले आहे.
‘काश्मीर आणि काश्मिरी हिंदूंचे भयाण वास्तव जगासमोर येण्यासाठी या चित्रपटाची ओळख जगाला होणे आवश्यक आहे’, असे प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटल्याचा दावा सामाजिक माध्यमांतून केला जात आहे. ‘सामान्य लोकांनाही हे मानांकन देता येण्यासाठी त्यांनी सामाजिक माध्यमांतून https://m.imdb.com/title/tt10811166/ ही संगणकीय मार्गिका (लिंकही) उपलब्ध करून दिली आहे’, असेही सामजिक माध्यमांनी केलेल्या दाव्यात म्हटले आहे.