भाजपचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी होणार !

बावनकुळे यांच्या काळात महावितरणने हाती घेतलेल्या कामांची खरंच आवश्यकता होती का ? त्या कामांचा लोकांना लाभ झाला का ?, हे शोधण्याचे काम चौकशी समिती करेल.

बोदाड (ता. मोरगांवग जि. यवतमाळ) येथील अंगणवाडी इमारत बांधकाम गेल्या १० वर्षांपासून अपूर्ण असल्याने गावातील मुलांना अंगणवाडी केंद्रात मिळणार्‍या सोयी उपलब्ध होत नाहीत !

शासनाचा लालफितीचा कारभार कसा चालतो याचे हे उत्तम उदाहरण आहे ! विद्यार्थी मिळणार्‍या सुविधांपासून वंचित रहातात, यापेक्षा दुर्दैव ते काय ?

‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे प्रमोशन न करण्याचा आमचाच निर्णय ! – अनुपम खेर, चित्रपट अभिनेता

आता खुद्द या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले आहे, ‘‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रसिद्धी न देण्याचा माझा निर्णय होता. कारण हा ‘कॉमेडी शो’ (विनोदी कार्यक्रम) आहे आणि चित्रपटाचा विषय हा गंभीर आहे.’’

धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या आरक्षणाच्या सवलती रोखण्यासाठी समिती नियुक्त करून निर्णय घेणार ! – के.सी. पाडवी, आदिवासी विकासमंत्री

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘राज्यात हिंदूंचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात चालू आहे. महाराष्ट्रातही धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे.’’

भिवंडी (ठाणे) येथील चित्रपटगृहात ‘द कश्मीर फाइल्स’ बंद पाडल्याची चौकशी करावी ! – राम कदम, आमदार, भाजप

‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याची भाजपच्या आमदारांची विधानसभेत पुन्हा जोरदार मागणी ! ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त करण्याविषयी सरकारची उदासीनता !

नवाब मलिक यांची ‘ईडी’च्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली !

मलिक यांनी केलेल्या या याचिकेला विरोध करत ‘ईडी’ने त्यांच्याविरोधातील कारवाई आणि त्यांची अटक आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायद्याला अनुसरूनच असल्याचा दावा करत ही याचिका फेटाळून लावण्याची न्यायालयाकडे मागणी केली होती.

राज्यातील शेतकर्‍यांची ३ मास वीज तोडणार नाही ! – ऊर्जामंत्री

शेतकर्‍यांचे हित आणि सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन आगामी ३ मासांसाठी शेतकर्‍यांची वीज तोडण्यात येणार नाही, तसेच ज्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे, त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत् करण्यात येईल.

रझा अकादमीच्या सांगण्यावरून ‘मुहंमद’ चित्रपटावर बंदी; मात्र ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष, हा कोणता ‘राष्ट्र’वाद ? – हिंदु जनजागृती समिती

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वर्ष १९९० मधील काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाविषयी आहे कि भारताच्या फाळणीविषयी’, हे राज्याच्या गृहमंत्र्यांना ठाऊक नसणे, हेच दुर्दैव !

खेळात प्राविण्यप्राप्त व्यक्तीची क्रीडाशिक्षकपदी नियुक्ती करण्याचे नवीन धोरण आणणार ! – कु. अदिती तटकरे, क्रीडाराज्यमंत्री

जागतिक, राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती ! भाजपचे भाई गिरकर यांच्या लक्षवेधीला दिलेले उत्तर !

राज्याच्या गोपनीयतेच्या सुरक्षेसाठी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी ! – शंभुराज देसाई, गृहराज्यमंत्री

राज्यातील ‘फोन टॅपिंग’ची गोपनीय माहिती बाहेर जाणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. फडणवीस यांना ही माहिती कशी मिळाली, याची माहिती घेण्यासाठीच त्यांची चौकशी करण्यात आली.