कसबा मतदारसंघात ब्राह्मण उमेदवार हवा ! – अतुल भगरे, ज्योतिषाचार्य

ज्योतिषाचार्य अतुल भगरे

पुणे – भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करून विजय मिळवला होता. ‘कसबा पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती टाळायची असेल, तर ब्राह्मण उमेदवाराला संधी द्या’, असे विधान ज्योतिषाचार्य अतुल भगरे गुरुजी यांनी केले. ‘ब्राह्मण महासंघा’चे अध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांनीही ब्राह्मण उमेदवाराची मागणी केली, तसेच राज्यातील किमान ३० मतदारसंघांमध्ये ब्राह्मण समाजाचे बहुमत आहे. तेथे ब्राह्मण उमेदवार द्यावेत, अशी मागणी समाजातून होत आहे.