दिवा येथील महापालिकेच्या शाळेतील प्रकार !
दिवा – दिव्यातील आगासन भागात असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ८८ मधील ४४ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाली. विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून इयत्ता पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारातील खिचडी खाऊन पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे ठाणे पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासनाने यातील अन्नाचे नमुने घेतले आहेत.
संपादकीय भूमिका :विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या पोषण आहाराची पडताळणी केली जाते का ? |