नवी मुंबई – स्थानिक शेतकर्यांचा विरोध झुगारून ‘एम्.एम्.आर्.डी.ए्.’च्या माध्यमातून ‘नवीन शहर विकास प्राधिकरण’ (‘एन्.टी.डी.ए.’) अंतर्गत तिसरी मुंबई उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील न्हावा-शिवडी सी लिंकच्या पलीकडे तिसरी मुंबई उभारण्यावर शिक्कामोर्तब केले.
तिसर्या मुंबई अंतर्गत येणार्या १२४ गावांच्या परिसरातील ३२३ चौ.कि.मी. क्षेत्राचा विकास राज्यशासन ‘एम्.एम्.आर्.डी.ए.’द्वारे करणार आहे. या १२४ गावांतर्गत सिडको विशेष प्राधिकरण असलेल्या नैना क्षेत्रातील ८० गावे आणि खोपटा नवे शहर या क्षेत्रातील ३३ गावे, ‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल प्लॅन’ अंतर्गत मोडणारी २ गावे आणि ‘रायगड रिजनल प्लॅन’ अंतर्गत मोडणारी ९ गावे यांचा समावेश आहे.