मुंबईतील सर्व शाळांना नामफलक मराठीत देणे बंधनकारक !

मुंबईमधील सर्व शाळांचे फलक मराठी भाषेत असावेत, यासाठी मुंबई महानगरपालिकेने ५ एप्रिल या दिवशी परिपत्रक काढले आहे. मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला

जितेंद्र आव्हाड यांना मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांविषयी नव्हे, तर मशीद आणि भोंगा यांविषयी पुळका ! – मनसे

जाधव यांनी म्हटले, ‘‘ठाण्यात वर्ष २००७-२००८ ला राबोडी आणि दुसरी भिवंडी या शहरांमध्ये दोन मोठ्या दंगली झाल्या होत्या. यात आपल्या दोन पोलिसांना प्राण गमावावे लागले होते. त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल ?

भोंगे उतरवण्याच्या न्यायालयाच्या कायद्याची आधी कार्यवाही करा !

हिंदूबहुल देशात हिंदूंना ध्वनीक्षेपकावर ‘हनुमान चालिसा’ लावण्याची बंदी आणि मशिदींवरील भोंगे अनेक वर्षे चालू आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

प्रवासी महिलेचे चुंबन घेणार्‍या व्यावसायिकाला १ वर्षाची शिक्षा

‘महिलांमध्ये गैरमौखिक इशारे समजण्याची जन्मजात क्षमता असते. त्यामुळे महिलेने अनावधानाने घडलेल्या चुकीविरोधात तक्रार केली’, असे म्हणता येणार नाही’, असे मत न्यायालयाने नोंदवले.

मशिदींवर भोंगे लावले, तर मंदिरावर दुप्पट आवाजात ‘हनुमान चालीसा’ लावा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

कोणत्या धर्मात लिहिले आहे की, मशिदींवर भोंगे लावा ? जेव्हा धर्म लिहिला गेला, तेव्हा भोंगे होते का ? युरोपमध्ये ध्वनीवर्धक कुठे आहेत ? तुमच्या परमेश्वराला प्रार्थना करा; पण घरात राहून. प्रत्येकाने धर्म घरात ठेवला पाहिजे.

नवी मुंबई (उलवे) येथे उभारणार तिरूपतीचे भव्य मंदिर !

ज्या भक्तांना आंध्रप्रदेश येथे जाऊन बालाजीचे दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी (उलवे) नवी मुंबई येथे भव्य तिरूपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच १० एकर जागेवर हे मंदिर उभारण्यात येणार आहे.

पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता आम्ही विकास करत आहोत ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कुणाला रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये, असा विकास हवा. सद्य:स्थितीत पर्यावरणाचा तोल ढासळत आहे. महाविकास आघाडी जनतेच्या हितासाठी काम करत आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाचे पंच आणि साक्षीदार प्रभाकर साईल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आर्यन खान याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात प्रभाकर हे अमली पदार्थविरोधी पथकाचे स्वतंत्र साक्षीदार होते. धाडसत्राच्या वेळी स्वतः क्रूझवर उपस्थित असल्याचा दावा त्यांनी केला होता.

भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे ६ एप्रिलपासून सेवा सप्ताहाचे आयोजन !

या निमित्ताने शहरात भाजपद्वारे नालेस्वच्छतेच्या कामांची पहाणी आणि देखरेख अभियान राबवून मुंबईकरांची सेवा करणार आहेत. मुंबई येथे १ सहस्र ५०० पेक्षांहून अधिक ठिकाणी या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे नेते आणि अधिवक्ता आशिष शेलार दिली.

मराठी भाषेचा ठसा पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अक्कल शिकवल्याविना रहाणार नाही ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राठी भाषेचा ठसा कुणी पुसायचा प्रयत्न केला, तर त्याला अक्कल शिकवल्याविना रहाणार नाही, अशी चेतावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.