माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी स्थगित !

अंमलबजावणी संचालनालयाने देशमुख यांच्या विरोधात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. ते या कटामागचे सूत्रधार (मास्टर माईंड) आहेत.

मद्यांच्या दुकानांना महापुरुष आणि गड-दुर्ग यांची नावे देऊ नयेत ! – मुंबई महानगरपालिका

राज्यशासनानेही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा !

(म्हणे) ‘गणेशोत्सवातील ‘डीजे’मुळे ध्वनीप्रदूषण होत नाही का ?’ – आमदार अबू आझमी

मशिदींवरील भोंगे काढण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश असतांना ते अद्याप का काढले गेले नाहीत ? त्यासाठी आझमी यांनी आजपर्यंत काय प्रयत्न केले ? या प्रश्नांची उत्तरे ते देतील का ?

‘सुपर मार्केट’मध्ये ‘वाईन’ विक्री करण्याविषयी सरकारने हरकती आणि सूचना मागवल्या !

जनतेला व्यसनमुक्त करण्याऐवजी तिला व्यसनाधीन बनवणारा हा निर्णय सरकारने तात्काळ रहित करावा, अशीच सर्वसामान्य जनतेची मागणी आहे !

मुंबईतील सर्व शाळांना नामफलक मराठीत देणे बंधनकारक !

मुंबईमधील सर्व शाळांचे फलक मराठी भाषेत असावेत, यासाठी मुंबई महानगरपालिकेने ५ एप्रिल या दिवशी परिपत्रक काढले आहे. मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला

जितेंद्र आव्हाड यांना मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांविषयी नव्हे, तर मशीद आणि भोंगा यांविषयी पुळका ! – मनसे

जाधव यांनी म्हटले, ‘‘ठाण्यात वर्ष २००७-२००८ ला राबोडी आणि दुसरी भिवंडी या शहरांमध्ये दोन मोठ्या दंगली झाल्या होत्या. यात आपल्या दोन पोलिसांना प्राण गमावावे लागले होते. त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल ?

भोंगे उतरवण्याच्या न्यायालयाच्या कायद्याची आधी कार्यवाही करा !

हिंदूबहुल देशात हिंदूंना ध्वनीक्षेपकावर ‘हनुमान चालिसा’ लावण्याची बंदी आणि मशिदींवरील भोंगे अनेक वर्षे चालू आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

प्रवासी महिलेचे चुंबन घेणार्‍या व्यावसायिकाला १ वर्षाची शिक्षा

‘महिलांमध्ये गैरमौखिक इशारे समजण्याची जन्मजात क्षमता असते. त्यामुळे महिलेने अनावधानाने घडलेल्या चुकीविरोधात तक्रार केली’, असे म्हणता येणार नाही’, असे मत न्यायालयाने नोंदवले.

मशिदींवर भोंगे लावले, तर मंदिरावर दुप्पट आवाजात ‘हनुमान चालीसा’ लावा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

कोणत्या धर्मात लिहिले आहे की, मशिदींवर भोंगे लावा ? जेव्हा धर्म लिहिला गेला, तेव्हा भोंगे होते का ? युरोपमध्ये ध्वनीवर्धक कुठे आहेत ? तुमच्या परमेश्वराला प्रार्थना करा; पण घरात राहून. प्रत्येकाने धर्म घरात ठेवला पाहिजे.

नवी मुंबई (उलवे) येथे उभारणार तिरूपतीचे भव्य मंदिर !

ज्या भक्तांना आंध्रप्रदेश येथे जाऊन बालाजीचे दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी (उलवे) नवी मुंबई येथे भव्य तिरूपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच १० एकर जागेवर हे मंदिर उभारण्यात येणार आहे.