बिहारमधील पोलिसांची ‘कर्तबगारी’ !
गोपालगंज (बिहार) – बोधगया येथून जादोपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कुरिअर वाहनातून अडीच क्विंटल गांजा (अमली पदार्थ) जप्त करून तो मंगलपूर येथे आणला; मात्र अधिकृतपणे केवळ ७० किलो जप्त केल्याची नोंद केली. उर्वरित गांजा दुसर्या तस्कराशी करार करून लाखो रुपयांना विकला गेला. गांजा जप्त करून त्याची विक्री केल्याचे उघड झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अवधेश दीक्षित यांनी पोलीस ठाण्याचे प्रमुख पिंटू यादव यांना निलंबित केले. त्याचबरोबर यामागे कोणकोणते लोक होते, याचेही अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाअशा पोलिसांना फाशीच शिक्षा करायला हवी ! तरच इतरांना वचक बसेल ! |