CAA For Bangladeshi Hindus : १ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७१ या कालावधीमध्‍ये बांगलादेशातून भारतात आलेल्‍यांना नागरिकत्‍व मिळणार !

‘कलम ६ अ’ला सर्वोच्‍च न्‍यायालयाने कायम ठेवले !

नवी देहली – सर्वोच्‍च न्‍यायालयाने ‘नागरिकता अधिनियम कलम ६ अ’ची वैधता कायम ठेवण्‍याचा निर्णय दिला आहे. वर्ष १९८५ च्‍या आसाम करारानुसार हे कलम आणण्‍यात आले होते. यानुसार वर्ष १९७१ पूर्वी भारतात आलेल्‍या सरसकट सर्व बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्‍व मिळणार नाही. १ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७१ या काळात जे बांगलादेशातून भारतात आले त्‍यांच्‍या नागरिकत्‍वाला आता धोका नाही. त्‍यांना नागरिकत्‍व मिळणार आहे. १२ डिसेंबर २०२३ या दिवशी या संदर्भातील १७ याचिकांवरील सुनावणी झाल्‍यानंतर सर्वोच्‍च न्‍यायालयाने या प्रकरणावरचा निर्णय राखून ठेवला होता.

आकडेवारीनुसार आसाममध्‍ये ४० लाख अवैध स्‍थलांतरीत नागरिक आहेत. बंगालमध्‍ये हीच संख्‍या ५७ लाखांच्‍या घरात आहे. आसाममधील स्‍थलांतरितांची अल्‍प संख्‍या पहाता या स्‍थलांतरितांसाठी एक निश्‍चित कालमर्यादा कायद्यान्‍वये ठरवणे आवश्‍यक होते. या निवाड्यानुसार ही कालमर्यादा आता २५ मार्च १९७१ अशी ठरवण्‍यात आली आहे.

संपादकीय भूमिका

यानंतर भारतात आलेल्‍यांना देशाबाहेर काढण्‍यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे का ?